रोबोट आणि माणसाची भन्नाट प्रेमकहाणी; 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे.

या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे. तसेच या ट्रेलरमध्ये कृती एका रोबोटची भूमिका साकारताना दिसत आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शाहिद आणि कृती यांच्या रोमँटिक सीननं होते. यामध्ये शाहिद हा कृतीचं भरभरुन कौतुक करताना दिसतो.

शाहिद हा सिफराला लग्नासाठी प्रपोज करतो आणि सुरु होते रोबोट आणि माणसाची प्रेमकहाणी. आता या प्रेमकहाणीमध्ये कोणकोणते ट्वीस्ट येणार? याचं उत्तर प्रेक्षकांना 9 फेब्रुवारीला मिळणार आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात कृती आणि शाहिद यांच्यासोबतच  धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

आता कृती आणि शाहिद हे 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.