Pune Maharashtra Kesari Kusti 2023

पैलवानांनो तयारीला लागा! तर या तारखेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार पुन्हा पैलवान आमने सामने भिडणार

Pune Maharashtra Kesari Kusti 2023 सुरू होणार आहे. Maharashtra Kesari Kusti ही पुणे जिल्ह्यात फुगावमध्ये रंगणार आहे.

हाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही नोव्हेंबर महिन्यात 07 ते 10 या दरम्यान कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत.

07 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेचे बक्षीस वितरण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे

या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 36 जिल्हे आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर होत आहेत.