New Kawasaki W230 Modern-Classic

कावासाकीने टोकियोमधील बिग साइट इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे सुरू असलेल्या जपान मोबिलिटी शोमध्ये आपले सर्व-नवीन आधुनिक क्लासिक W230 प्रदर्शित केले आहे.

अशी डिझाईन देण्यासाठी कॅबटन-शैलीतील एक्झॉस्ट सिस्टीम, टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, स्पोक व्हील अशा काही गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे.

बाईक पाहिल्यावर तुम्हाला जुन्या काळातील विकल्या जाणाऱ्या गाड्या यांसारखी दिसत आहे. तर या गाडीचे वजन हे 170 ते 190 किलो या दरम्यान असणार आहे.

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम यांसारख्या आधुनिक वैशिष्टे यात येतील.

बाईकला स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, गीअर पोझिशन, फ्युएल गेज, सर्व्हिस इंडिकेटर, स्टँड अलर्ट, वेळ पाहण्यासाठी घड्याळ आणि चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट अशा गोष्टींचा यात समावेश आहे.

या कावासाकी बाईकची इंजिन हे 230cc एवढे आहे, परंतु यात सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4 वाल्व स्ट्रोक इंजिन बसविण्यात आले आहे. तर हे इंजिन 19 hp पॉवर आणि 17 Nm पीक टॉर्क पॉवर जनरेट करत असते.

यासोबत सुरक्षा फ्रीचर्स लावण्यात आलेले आहेत, तर ते कोणते अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांपासून आपल्याला सेफ्टी मिळू शकणार आहे.

आपल्या भारतात 2024च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. या New Kawasaki W230 Modern-Classic गाडी लॉन्च करण्याची कोणतेही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

या बाईकची किंमत ही Royal Enfield Classic 350 याच्या पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तर या गाडीची किंमत ही 2 लाख रुपये ते 2.5 लाख रुपये एक्स शोरुम असू शकणार आहे.