Allu Arjun Pushpa 2 Fees: अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी फी घेतली नाही, पण करोडोंची कमाई करेल

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. पुष्पाची शैली, गाणी, संवाद सर्वच सुपरहिट झाले आहेत. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

अल्लू अर्जुन पुष्पा 2 हा चित्रपट विनामूल्य करत आहे. या चित्रपटासाठी त्याने कोणतेही शुल्क घेतलेले नाही. पण तरीही तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर करोडोंची कमाई करेल.

पुष्पा चित्रपटाचे OTT हक्क Amazon Prime Video ने 30 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. आता असे म्हटले जात आहे की नेटफ्लिक्स पुष्पा 2 चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेणार आहे

पुष्पा 2 चे हक्क 85 कोटींना विकले गेले आहेत. तर, पुष्पा: द राइजचे ओटीटी अधिकार म्हणजेच पहिला भाग अॅमेझॉन प्राइम व्हिडिओकडे आहे.

फोटोच्या मागे अल्लू अर्जुनचा चेहराही दिसत आहे. अल्लू अर्जुनने या फोटोला कॅप्शन दिले, “15 ऑगस्ट 2024!!!” ‘पुष्पा : द रुल’ हा चित्रपट पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.

अल्लू अर्जुनने ट्विटरवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत अल्लू अर्जुनचा हात दिसत आहे. या हातात तो अंगठा आणि सोनेरी रंगाच्या दगडांनी बनवलेले ब्रेसलेट घातलेला दिसत आहे.